सातारा - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ९९ व्या अधिवेशनात मराठी भाषा, शिक्षण, संस्कृती व मराठी भाषिकांच्या हक्कांशी संबंधित महत्त्वाचे एकूण १७ ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.

हिंदी वा तिसरी भाषा सक्तीच्या प्रयत्नांना ठाम विरोध करत नरेंद्र जाधव समिती तात्काळ रद्द करावी आणि राज्यात कोणत्याही शाळेत हिंदी वा तिसरी भाषा सक्तीची होणार नाही, याचे शासनाने लेखी अभिवचन द्यावे, अशी ठाम मागणी संमेलनाने केली.

राज्यातील मराठी माध्यमाच्या सुमारे १४ हजार शाळा बंद करण्याचा निर्णय तातडीने थांबवावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत बंद पडलेल्या शाळा पुन्हा सुरू कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. तसेच राज्यातील सुमारे ४० हजार शाळांमध्ये शालेय ग्रंथपालांची पदे भरावीत व नवीन पदनिर्मिती करावी, असा ठरावही मंजूर झाला. तज्ज्ञ भाषा सल्लागार समितीने २०२२ मध्ये सादर केलेले ५६ पानी संपूर्ण मराठी भाषा धोरण तात्काळ जाहीर करावे, तसेच मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी अपारंपरिक ‘आंतरराष्ट्रीय मराठी विद्यापीठ’ स्थापन करावे, अशी मागणी संमेलनाने केली.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील ८६५ गावांचा प्रश्न तातडीने सोडवून तो भाग महाराष्ट्रात समाविष्ट करावा, तसेच मराठीसाठी मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापन करावे, अशी मागणी करण्यात आली. ज्येष्ठ साहित्यिक व लोककलावंत अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा, असा ठराव संमेलनाने मंजूर केला.

मराठी विषय बारावीपर्यंत सक्तीचा करावा, अभिजात भाषेचे सर्व लाभ केंद्राकडून मिळवून घ्यावेत, मराठी अनुवाद अकादमी स्वायत्त स्वरूपात स्थापन करावी, गोवा व गुजरातमध्ये मराठीसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, तसेच सयाजीराव गायकवाड यांचे स्मारक व विमानतळ नामकरणाचे ठरावही मंजूर करण्यात आले. हे सर्व ठराव मराठी भाषा, संस्कृती व मराठी माणसाच्या हक्कांसाठी महत्त्वाचे असल्याचे मत संमेलनात व्यक्त करण्यात आले

तुमचे काय मत आहे?

तुमाला वाटते का की डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्म्स भारतातील ग्रामीण शिक्षणाचे भविष्य आहेत?

संबंधित बातम्या

पुन्हा वाढल्या 5वी पर्यंतच्या सुट्ट्या, थेट 'या' तारखेला सुरु होणार शाळा; 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील मोठी अपडेट!

हवामानातील बदल आणि थंडीच्या लाटेमुळे शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेतलाय.

केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा

राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यात नवी मुंबई महापालिकेत भाजपा आणि शिंदेसेना वेगळे निवडणूक लढत आहेत. याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील संघर्ष पाहायला मिळत आहे. यातच भाजपाने नवी मुंबई निवडणुकीत पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. मात्र या जाहीरनाम्यातील एका ओळीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.